धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन  दि. 25 जुन  रोजी धाराशिव तालु्नयातील आळणी येथे सकाळी 10  ते 4 या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात आळणी व परिसरातील सर्व वयोगटातील 650 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव प्रदिप वीर, युवा नेते बाबासाहेब गाटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौगुले, भाजपा तालुका सरचिटणीस रमाकांत लावंड, शालीय समिती अध्यक्ष विजय कुमार नांदे, सोसायटी चेअरमन लहु तोडकर, ग्रामपंचयत सदस्य अक्षय कदम, ग्रामपंचायत सदस्य  धनंजय कापसे, सोसायटी संचालक रंगानाथ कुदळे, दत्तात्रय किरदत्त, शंकरराव गाडे, हरिदास म्हेत्रे, दिपक कदम इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ अभिजित यादव, डॉ. प्रज्वल उकळीकर, डॉ. कपील डोंगरे, डॉ. अनिकेत सुतार, डॉ.विराज पाटील यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे अमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निशिकांत लोकरे, संदिप खोचरे व उपकेंद्राच्या परिचारीका डॉ. विलास तोडकर , श्रीमती सुष्मा मोटे, युवराज चौगुले व  आशा कार्यकर्त्या नंदा कदम, कालिंदा कदम, शोभा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.


 
Top