तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील नव्या बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर नवे बसस्थानकात स्वच्छता ठेवण्याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सध्या आषाढी वारी पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ पंढरपूरकडे जाणारा भाविक श्री तुळजाभवानी दर्शनार्थ येत आहेत. सध्या जुने बसस्थानक पुर्नबाधणीसाठी बंद असल्याने येथे प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. सध्या बसस्थानकात जाताना-येताना घाण पाण्यातुन ये-जा करावी लागत आहे.आत गेले तर बसस्थानकात केळीचा साली पडल्या असून, यावरुन प्रवाशी घसरुन पडण्याची शक्यता आहे. येथे कचरा टाकण्यासाठी असणारे डस्टबीन फुटके असुन ते दोरीने बांधले आहेत. येथे पिण्याच्या पाण्यासाठी टाकी आहे पण त्याला पाणीच येत नसल्याने भाविकांना विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागते. तरी आगारप्रमुख यांनी स्वछतेकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.


 
Top