धाराशिव (प्रतिनिधी)- शेतवस्तीवर मारहाण करून लुटणारी अट्टल आंतर जिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथे जावून जेरबंद केली.

अनुज उर्फ भैय्या नागेश भोसले, वय 25 रा. डोकेवाडी, ता. भुम व त्याचे इतर तीन साथीदार यांनी  मिळून  पो स्टे परंडा, बेंबळी  हद्दीत गुन्हे केल्याचे पथकास सागिंतले. यावरुन पथकाने नमूद पोलीस ठाणे येथे गुन्ह्या विषयी चौकशी केली असता पोलीस ठाणे परंडा व पोलीस ठाणे बेंबळी तसेच पाहीजे आरोपी पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नामे अमोल बापू काळे, रा. पांढरेवाडी ता. परंडा व त्यांचा एक साथीदार यांनी  पो. स्टे अंबी हद्दीतील मंदिरातील दानपेटी तोडून चोरी केल्याचे पथकास सागिंतले. पोलीस ठाणे अंबी गुन्हा दाखल आहे.  गुन्हे शाखेच्या पथकाने वरील नमुद गुन्हे उघडकीस आणुन दोन आरोपीनां ताब्यात घेवून त्यास पुढील कारवाईस्तव  पोलीस ठाणे परंडा, अंबी व बेंबळी यांचे ताब्यात दिले आहे. व पुढील आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉंवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक  यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोउपनि संदीप ओहळ, वलीउल्ला काझी, शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे,शैला टेळे, नितीन जाधवर, पांडूरंग सावंत, साईनाथ अशमोड, योगेश कोळी, कुंभार, कोलते कदम यांच्या पथकाने केली आहे.


 
Top