धाराशिव (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या नीट, 10 वी व 12 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपन्न केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या उपस्थिती मध्ये श्री सिध्दीविनायक परिवारातर्फे सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यशाचे शिखर गाठणार्या विद्यार्थ्यांचे जितके कष्ट आहे त्यापेक्षा जास्त त्यांच्या पालकांचे कष्ट आहे.आपल्या पाल्याला इतक्या मोठ्या गुणाने उत्तीर्ण करण्यामागे पालकांचा ही तितकाच समावेश आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात यश संपादन करण्यासाठी आपली संकल्प शक्ती नेहमीच जागृत ठेवून जिद्द, स्वयंशिस्त आणि स्वयं अध्यायानातील अशा महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष दिल्यास ध्येयपप्राप्ती निश्चित होते असे यावेळी श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले.
यावेळी बालाजी तांबे, नगरसेवक अभिजीत काकडे, दाजीआप्पा पवार, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, श्री सिध्दीविनायक डिस्ट्रिक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गोरे तसेच श्री सिध्दीविनायक परिवारातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.