तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे आचार्य कूटूंबात पाचव्या पिढीपासून चालत आलेला श्रीमद् भागवत सप्ताहास 27 जूनपासून प्रारंभ होत आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे ह.भ.प. बाळासाहेब आचार्य यांच्या कूटूंबात पाचव्या पिढीपासून श्रीमद् भागवत सप्ताह होत आहे. यावर्षी श्रीमद् भागवत सप्ताहास 27 जूनपासून 3 जुलैपर्यंत संपन्न होत आहे. 3 जुलैला गुरूपौर्णिमेच्या यादिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. 4 जुलैला गोकर्ण कथा होणार आहे. सकाळी संहिता वाचन दुपारी अर्थनिरूपण, सायंकाळी आरती असा दिनक्रम आहे. याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन ह.भ.प.बाळासाहेब आचार्य यांनी केले आहे.