धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्ष कमी प्रमाणात असल्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी ध्यानात घेउन त्यांनी जिल्ह्यात रुजू झाल्यापासून वृक्षलागवडीचा संकल्प केला असून त्यांनी पोलीस अधिकारी- अंमलदार, विद्यार्थी वर्ग, नागरीक यांच्या मदतीने येरमाळा येथील येडेश्वरी मंदीर परिसर, जिल्ह्यातील महामार्गालगत, भुम तालुक्यातील हाडोंग्री शिवार तसेच पोलीस मुख्यालय व पोलीस वसाहत आवार- परिसरात येडशी टोलनाका ते आळणी फाटा दरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. 

तसेच दि. 24 जून रोजी सकाळी 09.00 वा. सु. बालाजी मंदीर, तावशी गड, ता. लोहारा  येथील  90 हेक्टर शेत बाधांवर, वन शेती गायराणामध्ये वृक्ष लागवडीचा शुभारंभ  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आला. तसेच धाराशिव जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग असल्याने  धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी येणार्‍या आगामी काळात 10 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. 

त्या संदर्भाने सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, पोलीस उप अधीक्षक बरकते, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, लोहारा पोलीस ठाणेचे प्रभारी, सामाजिक कार्यकर्ते धीरज बाबुराव घोटाळे, मधुमती पाटील, सरपंच तावशीगड गावातील सर्व शेतकरी बांधव, व ग्रामस्थ्  तसेच जिल्हा परीषद शाळेचे विद्यार्थी हे उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे वेळी तावशीगड या ग्रामस्थाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वरील सर्व मान्यवर व जिल्हा परीषद शाळेचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्ष व फळझाडांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते शेतकरी बांधव व ग्रामस्थाना प्रशासकीय प्रमाणपत्र देण्यात आले.


 
Top