नळदुर्ग (प्रतिनिधी)- पुण्यतिथीचा खर्च टाळुन मंदिराची रंगरंगोटी करून धरणे कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. धरणे कुटुंबियांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी म्हटले आहे.

नळदुर्ग येथील प्रतीष्ठित व्यापारी कै. राजकुमार धरणे यांच्या तिसर्‍या पुण्यतिथी निमित्त धरणे कुटुंबियांनी पुण्यतीथीवर होणारा खर्च टाळुन व्यासनगर येथील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिरास रंगरंगोटी करून दिली आहे. धरणे कुटुंबियांच्या या कार्याचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.

नळदुर्ग येथील प्रतिष्ठित व्यापारी कै. राजकुमार धरणे यांच्या तिसर्‍या पुण्यतीथी निमित्त पुण्यतिथीवर होणारा खर्च टाळुन धरणे कुटुंबियांनी व्यासनगर येथील भाळे कुटुंबियांनी जीर्णोद्धार केलेल्या श्री उत्तरेश्वर महादेव मंदिरास रंगरंगोटी करून दिली. त्यामुळे महादेव मंदिर सुशोभीत झाले आहे. दि.29 जून रोजी आषाढी एकादशी दिवशी धरणे कुटुंबियांच्या वतीने श्री. उत्तरेश्वर महदेवास महाअभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी भक्तांना धरणे कुटुंबियांच्या वतीने केळीचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, बंडप्पा कसेकर तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर उभारणारे शंकर भाळे,अमर भाळे व पुराणिक उपस्थित होते.

 
Top