धाराशिव (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका पंढरीला जाणार्‍या विठ्ठल भक्तांना बसलाय. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागले.

राज्य राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील आगारातून पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाणार्‍या भाविक भक्तांसाठी स्वतंत्र बसेसची सोय करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला धाराशिव जिल्हा मुख्यालयासह तालुक्यातील अन्य 

आगारातून पंढरपूरला जाणार्‍या भाविकांना दुपारनंतर बसेस उपलब्ध नसल्याने ताटकळत थांबावे लागल्याची माहिती मिळते आहे. तर नियमित मार्गावर धावणार्‍या अनेक बसेस रद्द केल्याने दररोज ये-जा करणार्‍या प्रवाशांना बसेस उपलब्ध न झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अधून मधून कोसळणार्‍या हलक्या पावसाने प्रवाशांची तारांबळ उडाली.

 
Top