परंडा (प्रतिनिधी)-कल्याणसागर समुहातील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडाची विद्यार्थीनी डॉ. आयेशा अब्दुलकलीम हन्नुरे या विद्यार्थीनीने वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस.पूर्ण करुन, नीट पी.जी.2023 मध्ये ऑल इंडिया रँक 6786 क्रमांक मिळाला असून एम.डी. साठी पात्र ठरल्याबद्दल कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष  तथा माजी आमदार  सुजितसिंह ठाकूर  यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

याच वेळी वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण करणारी सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडाची विद्यार्थीनी डॅा. कु .सुयशा सुजितसिंह ठाकूर हिचाही सत्कार कल्याणसागर समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. या दोन्हीं विद्यार्थ्यांनीच्या पालकांचा पण यावेळेस  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सौ. शैलाताई ठाकूर, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा चे मुख्याध्यापक श्री किरण गरड, सर्व  सहशिक्षक उपस्थित होते. उपस्थितानी दोन्ही विद्यार्थीनीना पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top