तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्यातील सत्ताधारी जनतेचे मुलभुत प्रश्न  सोडविण्यासाठी अपयशी ठरल्याने आम्ही पुन्हा सत्तेवर येणार असुन 2024 ची निवडणुकीत मी  उतरणार व निवडुन येणार असे प्रतिपादन माजी मंञी मधुकर चव्हाण यांनी दि. 13 जून  रोजी शासकिय विश्रामधाम येथे पञकारांशी संवाद साधताना केले.

यावेळी पञकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले कि, तिर्थक्षेञ तुळजापूर विकास व कृष्णा खो-यातील 21 टीएमसी पाणी तुळजापूर तालुक्यात आणण्यासाठी मी अथक प्रयत्न केले आहेत हे यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे अशा टोला सत्ताधरींना यावेळी हाणला.

पहिली निवडणूक मी दहा हजार खर्च करुन जिंकलो नंतर लाखभर खर्च झाला मला जिंकण्यासाठी पैसा लागत नाही माझा विरोधात ऐक वेळी  निवडणुकीत पाच कोट्याधीश  दिगज धनवान उमेदवार उभे होते मोदीची सभा झाली तरीही मतदारांनी मला  निवडून दिले. सध्याचे सत्ताधार्‍यांचा कारभार हा जनतेच्या हिताचा नाही. महागाई  भष्ट्राचार वाढला. सर्वसामान्यांचे कामे होईनात, त्यामुळे हा सर्वसामान्य मतदार या कारभाराला कंटाळला आहे.  तो आता  महाविकास आघाडी पाठीशी ठामपणे उभा  राहील व महाविकास आघाडी निश्चीतच निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी मजुर वर्गाचा मतदानावर निवडून येईल असे यावेळी  म्हणाले. मी थेट सर्वसामान्यांच्या सुखादुखात सहभागी होतो.

 संवाद साधतो मी मागे ही भेटत होता यापुढे  तुळजापूर विधानसभा मतदार संघ फिरणार असल्याचे यावेळी म्हणाले. तुळजापूर तालुक्यात मागील चार वर्षात हजारो कोटी निधीच्या घोषणा झाल्या पण किती निधी विकास कामांनवर खर्च झाला असा सवाल केला. जलजीवन योजना माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी होत असुन हे कामे सर्वसामान्यांन साठी नाहीत तर गुत्तेदार जगविण्यासाठी असल्याचा आम्हाला वाटते तसेच शहरातील रस्ते वाहनांना बंंद केले हे योग्य नाही असे शेवटी म्हणाले.

जिपसदस्य प्रकाश चव्हाण कृषीउत्पन्नबाजारसमिती संचालक अशोक पाटील दिलीप सोमवंशी सेना अल्पसख्यांक सेल जिल्हाअध्यक्ष अमीर शेख महाविकासआघाडी चे नेते उपस्थितीत होते.


 
Top