तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील बसस्थानकात  महिला  बसमध्ये  चढत असताना  गर्दीचा फायदा घेऊन तिच्या गळ्यातील  38 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा दागिना अज्ञात चोरट्यांनी लंपास केले  सांयकाळी सवापाच वाजता घडली. 

या बाबतीत अधिकमाहीतीअशीकी बिजनवाडी, ता. तुळजापूर येथील- गोकुळ रामराव माने, वय 30 वर्षे, सोबत पत्नी उपासना हे दोघे दि. 12 जून रोजी सवापाच वाजण्याच्या सुमारास तुळजापूर बसस्थानक येथे तुळजापूर ते येवती बस मध्ये चढत होते. दरम्यान उपासना यांचे गळ्यातील अंदाजे 38 हजार रूपये  किमंतीचे सुवर्ण दागिणे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेले. अशा मजकुराच्या गोकुळ माने यांनी दि.13.06.2023 रोजी दिलेल्या फिर्याद वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात  भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top