तुळजापूर (प्रतिनिधी)-  नगर परिषदेने आता कर वसुलीसाठी नवी शक्कल लढवली असुन . थकबाकीदारांनी कराचा एक रकमी भरणा करावा यासाठी केंद्र सरकारने चलनातून मागे घेतलेल्या दोन हजारांच्या नोटा अमर्यादपणे स्वीकारण्याचा निर्णय न.प.प्रशासनाने घेतला आहे. 

त्याचबरोबर थकबाकीदारांवर कर सवलतींचा वर्षाव ही केला आहे.  

या   निर्णयामुळे  ऑगस्ट   अखेर  न. प.  तिजोरीत  अधिक  रक्कमेचा   भरणा  होईल,  असा  दावा  प्रशासनान े  केला    आहे. थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. थकीत कर भरण्यास असमर्थता दाखविणार्‍या थकबकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई पालिकेकडून गेल्यावर्षी करण्यात आली. या कारवाईनंतरही मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने जास्तीत जास्त प्रमाणात चलनातून बाद होत असलेल्या दोन हजाराच्या नोटा नगरपरिषद कार्यालयात जमा करून वसुलीसाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांनी केले आहे.


 
Top