धाराशिव (प्रतिनिधी)- बिअर शॉपीसाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी उमरगा तालु्नयातील येणेगुर येथील ग्रामसेवकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. यामध्ये लाच मागितल्या प्रकरणी चार वेळा पडताळणी करण्यात आली आहे.

येणेगुर येथे शरदचंद. ताम्रध्वज बलुसरे (वय 46) ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एका व्यावसायिकाने येणेगूर येथील शेतात बिअर शॉपी सुरू करण्याकरिता ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र व ठराव मिळण्यासाठी अर्जव केला होता. ना हरकत प्रमाणपत्र व ठराव देण्यासाठी ग्रामसेवक बलसुरे याने 24 एप्रिलला पंच साक्षीदारांसमक्ष पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यावरून 27 एप्रिललाच सापळा कारवाई करण्यात आली होती. परंतु बलसुरे हजर नसल्याने सापळा कारवाई स्थगित करण्यात आली. त्याला संशय आल्याने त्याने नंतर लाच र्नकम स्विकारली नाही. यामुळे त्याच्यावर मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


 
Top