धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शुक्रवार दि. 16 जुन  रोजी सौंदना (आंबा), ता. कळंब येथे सकाळी 10 ते 4  या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात सौंदना (आंबा) व परिसरातील सर्व वयोगटातील 365 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ट विश्वस्त अशोक भाऊ शिंदे व विजय आण्णा चव्हाण यांच्या हस्ते झाले या वेळी प्रमुख पाहुने मा उप सभापती भगवान ओव्हाळ ग्रामपंचायत सदस्य महेश काळे,रामभाऊ गायकवाड,नवनाथ गायकवाड ,धोडिंबा पालकर, मुकूद पालकर नामदेव शेळके यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ ऋतुजा देशमुख, डॉ. ऋतुजा गायकवाड, डॉ. सचिन शिंदे, डॉ. अतुल जमदारे, डॉ.विजय बोराडे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सुशिल देटे, अजित थिटे सचिन, व्हटकर व उपकेंद्राच्या आशा कार्यकर्त्या यांनी परीश्रम घेतले.


 
Top