धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूलबसेसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे स्कूलबसेसची वेगमर्यादा, वाहनांची वयोमर्यादा आणि दरवाजे, खिडक्या याची तपासणी करण्यासाठी सक्षम अधिकार्यांची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील यांनी जिल्हाधिकार्यांसह पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील यांनी सोमवारी (दि.12) याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दि. 12/06/2023 पासून जिल्हयातील शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कुलबसचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. स्कूलबसेसमधून वय 04 वर्षापासुन ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना . दररोज ने-आण केली जात आहे. तसेच काही शाळांच्या स्कुल बसेस अतिवेगात, तसेच मुलांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करुन चालविल्या जातात. अनेक स्कुल बसेस नादुरुस्त, तसेच जुन्या झालेला असून काही स्कुल बसेस वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे बस चालकाचा परवाना, गाडीचे फिटनेस योग्य असणे तसेच स्कुलबसचे दरवाजा, खिडकी व वेग नियंत्रण इत्यादी सुस्थितीत असणे गरजेचे आहे. तरी जिल्हयातील सर्व स्कुलबसचे फिटनेस सुस्थितीत आहे का नाही? याची खात्री करण्यासाठी आपण सक्षम अधिकार्याची नेमणूक करुन सर्व शाळांच्या स्कुलबसेची तपासणी करण्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


 
Top