परंडा (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या आराध्यदैवत महापुरुषांबद्दल आक्षेपाहार्य मानहानीकारक पोष्ट व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकल्याच्या निषेधार्थ परंडा शहर आज दि.28 रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सदरील पोष्ट तालुक्यातील खासापुरी येथील एका समाज कंटकाने  व्हॉटस्अॅप ग्रुपवर मंगळवारी ( दि. 27) रोजी व्हायरल केली. या निषेधार्थ शहर कडकडीत बंद असून शिवप्रेमी युवकांनी शहरातून जय भवानी, जय शिवाजी घोषणा देत मोटार सायकल रॅली काढली. त्यानंतर सदरील घटनेच्या निषेधार्थ तहसिलदार अडसूळ व पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अमोल भुजबळ यांना निवेदन देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या समाज कंटकास तात्काळ अटक करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत परंडा पोलिसांनी पोस्ट टाकणार्‍या एका समाज कंटकास अटक केली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

 
Top