तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील तहसिल, पंचायत समिती, कृषी कार्यालयास नवे कारभारी अधिकारी मिळाले असल्याने या कार्यालयांच्या कामकाजात सुसुञता येणार आहे उपमुखमंञी देंवेद्र फडणवीस यांच्या तुळजापूर दौर्यापुर्वी हे अधिकारी आल्याने उपमुखमंञी दौर्याचे फलित तर नाही हा अशी चर्चा होत आहै. नगरपरिषद व श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला नवे कारभारी कधी मिळणार असा प्रश्न तालुका वासियांन मधुन विचारला जात आहे. या पुर्वी तहसिलचे तहसिलदार सौदागर तांदळे यांची बदली परभणी जिल्हयातील पाथरी पंचायत समिती प्रशांतसिंह म रोडची उमरग्याला तसेच कृषी कार्यालयाला तर कारभारी नव्हता प्रभारी वर कारभार चालत होता तर
नगरपरिषदचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांची कोकणात व मंदिर स्थांनच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांची मुंबईला बदली झाल्या .सगळ्या कार्यालय प्रमुखांचा ऐकदम बदल्या झाल्याने या कार्यालयांचा कामकाजात शिथलता आल्याने तालुका वासियांंचे कामे वेळेवर होत नव्हते त्यामुळे गैरसोयीना सामोरे जावे लागत होते. अखेर उपमुखमंञी देंवेद्र फडणवीस यांच्या तिर्थक्षेञ तुळजापूर दौर्या पुर्वी तीन प्रमुख अधिकारी नियूक्त झाल्याने उपमुखमंञी देंवेद्रफडणवीस यांच्या दौर्यामुळेच तीन अधिकारी तुळजापूर तालुक्याला लाभल्याची मिळाल्याची चर्चा चर्चिली जात आहे.
आता तहसिलदार म्हणून बाळासाहेब बोंळगे कृषी अधिकारी म्हणून अद्वेत मुळे व गटविकास अधिकारी म्हणून अमोल ताकभाते हे तरुण अधिकारी पुर्ण वेळ लाभल्याने तालुक्याचा कारभार सक्षम पणे चालणार आहे.