धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.पदमसिंह पाटील व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन मंगळवार दि. 27 जुन  रोजी कळंब तालु्नयातील आंदोरा येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात आंदोरा व परिसरातील सर्व वयोगटातील  625 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ट विश्वस्त अशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते झाले.  या वेळी प्रमुख पाहुने सतिष कवडे, मनोज गाडे, दिपक कवडे, अजय तांबारे, सचिन कवडे, सुरेश कवडे, आश्रुबा घुगरे, अशोक तांबारे, पाडुरंग तांबारे इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ अभिजित यादव, डॉ. प्रज्वल उकळीकर, डॉ. कपील डोंगरे, डॉ. अनिकेत सुतार, डॉ.विराज पाटील यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निशिकांत लोकरे, संदिप खोचरे व आंदोरा उपकेंद्राचे कर्मचारी व आशा कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.

 
Top