वाशी (प्रतिनिधी)- आषाढी एकादशी ही हिंदू समाजाची सर्वात मोठी एकादशी आहे. तसेच कुर्बानीचा सण हा मुस्लिम बांधवांचा पण पवित्र आहे. आषाढी एकादशी व बकरी ईद ही एकाच दिवशी येत असल्यामुळे एकादशीचे पावित्र्य राखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या निमित्ताने कसल्याही प्रकारची पशुची कत्त्तल न करता दुसर्‍या दिवशी साजरी करण्याचा निर्णय घेतलां. 

वाशी हे गाव राष्ट्रीय एकात्मता तसेच हिंदू-मुस्लीम एकोपा जोपासणारे गाव आहे. यापूर्वीही वाशी गावामध्ये जैन समाजाचे एकही घर नसताना कुंथलगिरी या जैन समाजाच्या यात्रेनिमित्त मुस्लिम समाजाने कुर्बानीचा सण पुढे ढकलला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन वाशी येथे बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. काझी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हरून काझी, मयूउद्दीन काझी, रूकमुद्दीन काझी, खुर्शीद कुरेशी, नवाब काझी, मौलाना वसीम बागवान, इनायत नाईकवाडी इत्यादी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निर्णयाचे स्वागत मच्छिंद्र तात्या कवडे, शिवसेना तालुकाध्यक्ष विकास मोळवणे, शिवसेना नेते प्रशांत चेडे, नगरपंचायतचे उपाध्यक्ष सुरेश  कवडे, हभप. शंकर महाराज थोबडे, सदाशिवराव जगताप, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव बळीराम जगताप, नगरपंचायतचे सदस्य विकास पवार, विलास देशमुख, दादा चेडे यांनी मुस्लिम बांधवांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


 
Top