धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने दि. 21 जून 2023 हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे दिले आहेत.
त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, आयुष विभाग, नेहरु युवा केंद्र, आर्ट ऑफ लिव्हींग, क्रीडा भारती, उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट योग असोशिएशन, पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शाळा, महाविद्यालयात, प्रत्येक नागरिकाने, जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापना यांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी सकाळी 7.00 ते 8.00 या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत व आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे फोटो आणि अहवाल (उपस्थिती संख्या) 9923531423 या भ्रमणध्वनीवर किंवा वळीींीिेीींी.ेीारपरलरवऽसारळश्र.लेा या ई-मेलवर दि.21 जून रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाठविण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.