धाराशिव (प्रतिनिधी)- तालु्नयातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या शाळेत मिळून दहा विद्यार्थ्यांची तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयसाठी निवड झाली.
केंद्रीय शाळेचे सोहम प्रताप करंजकर, उजेफ हाजुमिया शेख, स्वप्निल चंद्रकांत विभूते, सोहम संतोष गावखरे, यशराज घनश्याम धाबेकर, कार्तिक धनाजी कोळी तर कन्या शाळेची कुमारी अमृता शिवाजी देशमाने, कु.समृद्धी दिगंबर करंजकर, कु.माधूरी सूर्यकृष्ण पवार, कु. संस्कृती सत्यवान म्हेत्रे या चार मुली असे एकूण दहा विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूरसाठी झालेल्या प्रवेश परिक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, गटशिक्षणाधिकारी सय्यद, विस्तार आधिकारी किशोरी जोशी, केंद्रप्रमुख जगदीश जाकते, केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक पवार, कन्या शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच जगनाथ धायगुडे, बाळासाहेब जमाले, ढवळे ,जानराव, कोळी मॅडम, मगर, शहाजी पुरी व दोन्हीं शाळेतील सर्व शिक्षक यांचे बहुमोल असे मागदर्शक लाभले आहे.