धाराशिव / प्रतिनिधी-

  आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले नगरपालिकेचे माजी गटनेते युवराज  नळे यांची भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष  आ. चंद्रशेखरजी बावनकुळे   यांनी भारतीय जनता पक्षाच्या "प्रदेश कार्यकारिणी सदस्य" म्हणून नियुक्ती केली आहे. 

प्रदेश अध्यक्ष या. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आणि आ.राणा जगजितसिंह पाटील, मा.सुजितसिंह ठाकूर, प्रदेश संघटनमंत्री मा.संजयजी कौडगे साहेब यांच्या उपस्थितीत हे  नियुक्तीपत्र  देण्यात आले. यावेळी युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष राहूलजी लोणीकर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, सुरेशभाऊ देशमुख, बाळासाहेब क्षिरसागर व पक्षाचे इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.

 
Top