सोलापुर (प्रतिनिधी) :- डॉ. शिवराज मानसपुरे एमबीबीएस एम.डी (शरीरशास्त्र) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा  2011 बॅचचे अधिकारी असून त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून आज पदभार स्वीकारला आहे.  रेल्वे बोर्डात माहिती आणि प्रसिद्धी संचालक म्हणून रुजू झालेल्या श्री शिवाजी सुतार यांच्यानंतर त्यांनी पदग्रहण केले आहे.

 मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. शिवराज मानसपुरे हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.  त्यांनी मध्य रेल्वेवर विभागीय परीचालन व्यवस्थापक, सोलापूर विभाग, उपमुख्य परीचालन व्यवस्थापक, निर्माण विभाग, मुंबई आणि वरिष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग यासारख्या विविध पदांवर काम केले आहे.

सोलापूर विभागातील उत्कृष्ट ट्रेन परीचालन कामगिरीबद्दल त्यांना  मध्ये महाव्यवस्थापक श्रेत्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  - मध्ये मुंबई विभागातील लोकल उपनगरी गाड्या आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या उत्कृष्ट ट्रेन परीचालानासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट वक्तशीरता क्षेत्रीय शिल्ड देखील मिळाली आहे.  मुंबई विभागावर उपनगरीय सेवा, मेल/एक्स्प्रेस गाड्या चालवण्यासाठी मुंबई विभागाची गुणवत्ता सुधारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.  त्यांनी उपनगरीय वेळापत्रकाच्या  एकत्रिकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामुळे अतिरिक्त उपनगरीय सेवांसाठी मार्ग तयार झाले.  ठाणे-दिवा नवीन वे आणि वे रेल्वे मार्ग पूर्ण करताना या नवीन रेल्वे मार्गांच्या बांधकामासाठी विविध मेंटेनन्स ब्लॉक्सची व्यवस्था करणे आणि त्याच वेळी सुमारे  दिवस ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या चालू ठेवणे या कामात त्यांचा मोलाचा वाटा होता.

 
Top