सोलापुर (प्रतिनिधी) :- रेल मंत्रालय भारत सरकारच्या उत्तम प्रशासनाचा भाग म्हणून  व्हर्च्यूअल व प्रत्यक्ष पेंशन अदालतचे दिनांक. 17.05.2023 रोजी सकाळी 11: 30 वाजता सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या आणि परिवार पेंशनरच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी देशव्यापी पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले. या अदालतचे आयोजन करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे पेंशन धारकाच्या तक्रारीचे शासनाच्या वर्तमान निर्देशानुसार तत्परतेने निराकरण करने हा आहे. या   व्हर्च्यूअल व प्रत्यक्ष पेंशन अदालतमध्ये  सेवानिवृत्त कर्मचारी  संघटनाचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि परिवार यांनी भाग घेतला. 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक  कार्मिक आधिकारी श्री. एस. एल. खोत यांनी केले व वरिष्ठ मंडल कार्मिक आधिकारी श्री. जी. पी. भगत यांनी पेंशन अदालतचे महत्व व तक्रारीचे निराकरण करण्याच्या प्रशासनाच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली.  मंड्ल रेल प्रबंधक श्री. निरजकुमार दोहरे यांनी पेन्शनधारकांना असेही सूचित केले की, त्यांनी पेन्शन अदालतची वाट न पाहता त्यांच्या तक्रारी कधीही कार्यालयीन वेळेत सादर करू शकतात आणि नियमानुसार त्यांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना वेळेत उत्तर दिले जाईल. तसेच वरिष्ठ मंडल वित्त प्रबंधक श्री. विवेक होके , सहाय्यक मंडल वित्त प्रबंधक श्री. विशाल बी. देवके व श्री. मंगेश कुलकर्णी  यांनी पण वेतन सबंधी व पेंशन पे आर्डर संबंधीत तक्रारींचे निवारण केले. 

सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या एकुण 17 तक्रारी होत्या त्या सर्व तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या परिवारांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले व पेन्शनधारकांना तीन केसेसमधे रु. 01,39,580/- ( एक लाख एकोनचाळीस हजार पाचशे आंशी मात्र)  एन ई एफ टी द्वारे वाटप करण्यात आले.

ही व्हर्च्यूअल व प्रत्यक्ष पेंशन अदालत यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्य कार्यालय अधिक्षक श्री. एस. एल. कांबळे, मुख्य कर्मचारी कल्याण निरिक्षक श्री. महावीर  निमानी, वरिष्ठ   अनुभाग अधिकारी श्री. एच.एस. क्षिरसागर, व्हर्च्यूअल पेंशन अदालतच्या तांत्रीक सेटअपसाठी डी. बी. ए. श्री. रफीक शेख व कार्मिक निपटारा विभाग आणि लेखा निपटारा विभागाचे सर्व कर्मचारी श्रीमती वंदना धोत्रे, श्री. संजीवकुमार, विजयसिंग चव्हाण, सुनिल पवार, संदीप ढेरे, श्रीमती बबीता आरडले , श्री आसलम शेख, आर. डी. माने, नवनाथ फंड यांनी मेहनत घेतली.    

 
Top