सोलापुर (प्रतिनिधी) :-  मध्य रेल, सोलापुर विभागावर, रेल्वे उपयोगकर्ता सल्लानगार समितीची बैठक आज दिनांक 19 मे -2023 रोजी समितिचे अध्यक्ष  व मंडल रेल प्रबंधक, श्री. नीरज कुमार दोहरे प्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितिच्या, बैठकीच्या सुरवातीस समितिचे सचिव व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री एल. के रणयेवले यांनी बैठकीस उपस्थीत सर्व सदस्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रस्तावीक केले. त्याप्रमाणे सोलापुर विभागातील यात्रा सुखसुविधाबद्द्ल झालेल्या कामाबाबत आणि चालू कामाबाबत माहिती दिली.

             मंडल रेल प्रबंधक/सोलापुर श्री श्री. नीरज कुमार दोहरे यांनी आपल्या अध्याक्षीय भाषणात  समितीच्या सदस्यांरचे स्वागत केले. समितीच्या सदस्यांसचे अमुल्य सुझावामुळे प्रवासी व मालवाहतुकीमध्यें सक्रिय सह्योग व सकारात्मक योगदानाच्या माध्यमातुन सोलापुर विभाग प्रगती पथावर पोह्चत आहे. आमचे विचार प्रवाशांच्या सुख सुविधा करीता आहेत. त्याचप्रमाणे सोलापुर विभागावर केलेल्या रेल्वे प्रवाशांच्या सुख्-सुविधेच्या संबंधी महत्वचपुर्ण कार्याचा उल्लेख केला  रेल्वे अमृत भारत योजने   मध्ये  सोलापूर मंडळातील समावीष्ठ स्टेशन बद्दल माहिती दिली  व जे समितिचे सदस्य रेल्वेशी संबंधी सुझाव व समस्या मांडतील ते पुर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील.  

वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री एल. के रणयेवले यांनी समितीच्या  सदस्यांना अनुरोध केले की रेल्वे प्रवाशांच्या समस्यांच्या संबंधित विषयावर चर्चा करावी. सोलापुर विभागावरील सदस्यांनी आपआपल्या विभागाशी संबंधित रेल्वे स्टेशन व परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरीता महत्वापुर्ण मुद्यावर चर्चा केली जे मुद्दे/समस्यां विभागीय स्तरावरील आहेत त्यांना अग्रक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व जे मुद्दे मुख्यालय स्तरीसय आहेत त्यांना मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे.

सदर बैठकीस सोलापुर विभागावरील उपयोगकर्ता सल्लातगार समितीवर निवड झालेले  सर्व सदस्य व सोलापुर रेल्वे विभागाचे अधिकारी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेद्रसिंह परिहार,  वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक व समितिचे सचिव एल. के रणयेवले, वरिष्ठ  मंडल परिचालन प्रबंधक श्री. प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल अभियंता (समन्वय) श्री. चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय सिंग्नल व दूरसंचार अभियंता श्री राहुल गौर, विभागीय सुरक्षा आयुक्त प्रशांत संसारे  व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 सदर आयोजित केलेल्या बैठक यशस्वीते बद्दल  समितीचे सदस्यांने कौतुक व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक व समितिचे सचिव श्री एल. के रणयेवले यांनी  उपस्थित समितिच्या सदस्यांचे व अधिका-यांचे आभार मानले. 


 
Top