धाराशिव / प्रतिनिधी-
 प्रवाशांची मागणीवर आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन  गाडी क्र. 01137/01138 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैद्रराबाद- पुणे विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.  
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
 गाडी क्र. 01137 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हेदराबाद विशेष एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाहून दि. 10.05.2022 ( बुधवार) ला रात्री  12.30 वा. सुटणार पुढे दादर, ठाणे, कल्याण , लोणावळा, पुणे, दौंड आगमन 06.00 प्रस्थान 06.03,   कुर्डूवाडी आगमन 07.35 प्रस्थान 07.40 , बार्शी  टाउन आगमन 08.30 प्रस्थान 08.32 , धारशिव आगमन 9.00 प्रस्थान 09.02, लातूर आगमन 11.50 प्रस्थान 11.55, लातूर रोड , उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद , लिंगमपल्ली, बेगमपेठ,  हेदराबाद ला (बुधवारी) संध्याकाळी  06.30 वा. पोहचणार.
 गाडी क्र. 01138 हेदराबाद- पुणे विशेष एक्सप्रेस हेदराबाद स्थानकाहून दि. 10.05.2023 (बुधवारी) ला रात्री 08.00 वा. सुटणार पुढे बेगमपेठ, लिंगमपल्ली, विकाराबाद , जाहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड , लातूर आगमन 03.50 प्रस्थान 03.55, धारशिव आगमन 05.08 प्रस्थान 05.10, बार्शी  टाउन आगमन 06.03 प्रस्थान 06.05, कुर्डूवाडी आगमन 07.25 प्रस्थान 07.30, दौंड आगमन 10.00 प्रस्थान 10.03, पुण्याला    ( गुरुवार) रात्री 12.05 वा. पोहचणार.
 डब्यांची  सरचना : गार्ड कम लगेज  -2, जनरल   -11,  चेअर कार 3एसी -1 एकूण 14 कोच असतील . 
 प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तरी सर्व संबंधित रेल्वे  प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा.
 
Top