धाराशिव / प्रतिनिधी-

नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या बॉईज हॉस्टेल परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- जनकल्याण समिती द्वारा आयोजित उन्हाळी संस्कार वर्ग संपन्न जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोपशेठवार व संस्कार भारतीचे कलाध्यापक शेषनाथ वाघ शिबिरार्थी प्रतिनिधिंनी दीप प्रज्वलन करून औपचारिक रित्या शिबिराचे उद्घाटन केले.

 मुलांमधील नैसर्गिक क्षमतांचा विकास  व्हावा त्यांच्यामधील क्षमतांची जाणीव त्यांना व्हावी, मैदानावर खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांचा व कलेचा, संस्कृती परंपरा आजच्या या मुलामुलींना परिचय व्हावा या उद्देशाने जनकल्याण समिती मागील वर्षापासून तीन दिवसीय उन्हाळी संस्कार वगाचे आयोजन करत

आहे. बलोपासनेसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार कसे घालावेत याचे प्रशिक्षण या वर्गात मुलांना देण्यात येत आहे. देशभक्तीपर पद्य तसेच दैनंदिन नित्यक्रमात म्हटले जाणारे संस्कृत श्लोक यांचे पाठांतर मुलांकडून करून घेतले जात आहे.या संस्कार वर्गामध्ये शिबिरार्थी मुला मुलींच्या शारीरिक प्रशिक्षणासाठी अमोल पाटणकर, नितीन पाम्पटवार, चंद्रकांत पत्की, प्रवीण कुलकर्णी, शिवराज हंगरगे, महेंद्र इटोलिकर, अमोल आंबेकर हे प्रशिक्षक म्हणून विशेष लक्ष देत आहेत. लोककला व परंपरांचा मुलांना परिचय व्हावा यासाठी संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधा सहप्रमुख , श्रीपतराव भोसले विद्यालय उस्मानाबाद येथे कार्यरत कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी मुलांसमोर पोतराज या व्यक्तिरेखेबद्दल माहिती सांगून प्रत्यक्ष पोतराज वेशभुषेत सादरीकरण केले लोककला लोकपावत चालली असून आपल्या राष्ट्राच्या संस्कृती परंपरे वर पाश्चात संस्कृतीचे आक्रमण होत असून नविन पिढीने लोककलेचा वारसा संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे . सौ .अनघा श्रृंगारपुरे या शिबिर प्रमुख म्हणून व्यवस्था पहात आहेत तर संस्कार भारती चे देवगिरी प्रांत महामंत्री जगदीश देशमुख, सहकोष प्रमुख अभय श्रृंगारपुरे, शहराध्यक्ष जयंत वाकोडकर , सत्यहरी वाघ आवर्जून उपस्थित होते .या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनकल्याण समितीचे कार्यवाह डॉ. प्रदीप वेसनेकर, श्वेता देशमुख, श्रीकृष्ण किंगरी, चंद्रकांत देगावकर, उमाताई सोनटक्के, कहाळेकर, अशोक गट्टेवार, मुकुंद धानोरकर यांच्यासह जनकल्याण समिती व रा. स्व. संघाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

 
Top