तुळजापूर /प्रतिनिधी - 

शहरातील  धाराशिव-सोलापूर बायपास रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने कार खोल खड्ड्यात जावुन पलटी होवुन  झालेल्या भीषण अपघातात एक ठार तर दहा जखमी झाले आहेत. सदरील अपघात रविवार दि.१४रोजी दुपारी चार वाजता घडला.

 पलटी गाडीतील जखमीना युवा उद्योजक  राहुल भोसले व पोलिसांनी वेळीच  बाहेर काढुन तातडीने दोन अँम्ब्युलन्स मधुन धाराशीव जिल्हा रुग्णालयात नेल्याने  अनेक जखमी चे प्राण वाचले.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, येथील  मंडळी  कार (क्रमांक MH45AD9195 मधुन तुळजापूर  बायपास वरुन सोलापूर कडे जाताना मोतीझरा स्मशान भूमीचा पाठीमागे असणाऱ्या रस्त्यावर अचानक कारच्या उजव्या  बाजूचे टायर फुटल्याने कार थेट रस्ता शेजारी असणाऱ्या खोल खड्डीत पडली.यात वाहनचालक शेजारी बसलेले वसंत महादेव कुंभार ६५ (रा. हिंगणगाव ता कवठे )महाकांळ जि सांगली यांना डोक्याला मार लागल्यामुळे जागीच   ठार तर गाडीतील पाच मोठे व पाच लहान मुले पलटी गाडीत अडकले असता सदरील अपघामाहीती मिळताच पोलिस व युवा उधोजक राहुल भोसले यांनी पलटी झालेल्या कार क्रेनने वर उचलुन जखमीना बाहेर काढले व तातडीने धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ अँब्युलंन्स मधुन ततडीने रवाना केले.यामुळे गाडीत अडकल्यालांचे प्राण वाचले यात अकराते बारा  वर्षाचा दोन  मुलीं गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे

 
Top