धाराशिव / प्रतिनिधी-

 “विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच आजूबाजूच्या  तसेच जगातील सर्व घडामोडीचा अभ्यास आपल्या दैनंदिन अभ्यासाबरोबर आत्मसात केला तरच आपले ध्येय निश्चित गाठू शकतात व आपले करिअर घडवू शकतात” असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. 

 दि. 8 मे 2023 रोजी शासकीय आयटीआय उस्मानाबाद येथील छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी  जिल्हा  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  प्रवीण औताडे, सहाय्यक आयुक्त संजय गुरव, कौशल्य विकास मंत्री यांचे स्वीय सहाय्यक श्री. पालवे, व्याख्याते संतोष कारले, गणेश चादरे, संजय देशमाने, तुकाराम सोलापुरे, डॉ. सुयोग अमृतराव तसेच जिल्ह्यातील सर्व शहरातील विविध शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य व्यासपीठावर उपस्थित होते.

  या करिअर शिबिरामध्ये  संतोष कारले यांनी  'दहावी, बारावीनंतर काय'?, गणेश चांदरे यांनी 'व्यक्तिमत्व विकास', तुकाराम सोलापुरे यांनी 'स्पर्धा परीक्षा, 'तसेच संजय देशमाने यांनी 'यशस्वी उद्योजक होण्याचा मंत्र' आणि डॉ. सुयोग अमृतराव यांनी 'मुलाखतीची तयारी व बायोडाटा तयार करणे' या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी विविध शासकीय विभागांच्या स्टॉलचे व करिअर प्रदर्शनाचे उद्घाटन ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाभरातील सर्व शासकीय व  आशासकीय आयटीआय, एम.सी.व्ही.सी , बायफोकल व जिल्हाभरातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शहरातील शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या याप्रसंगी महिला विद्यार्थिनीची संख्या लक्षणीय होती, सर्वांनी येथील करिअर मार्गदर्शनाच्या व विविध शासकीय योजनांच्या तसेच विविध कर्ज देणाऱ्या महामंडळाच्या स्टॉलचा जसे आय टी आय, शासकीय तंत्रनिकेतन, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अल्पसंख्यांक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ, दिव्यांग महामंडळ, बी.टी.आर.आय. विभाग, आय.सी.आय.सी.आय. बँक, जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा स्टॉल आदी स्टॉलचा सहभाग होता. याप्रसंगी जवळपास 1 हजार 836 विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या करिअर मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम स्थळी आयोजकांकडून दिवसभर अल्पोपाहाराची व थंड पाण्याची सोय करण्यात आली होती.

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राचार्य हर्षद राजूरकर, मारुतीराव बिरादार, संतोष कदम, संतोष कांबळे, केशव पवार तसेच गटनिर्देशक भारत जाधव, अच्युत सर्वदे, सखाराम राऊत, फत्तेसिंह जगताप तसेच शिल्प निदेशक गणेश कोरे, मनोज चौधरी, किरण झरकर, दीपक गुडे, रघुवीर येरकल, बालाजी वाघमारे, श्री. शेख, श्री. निर्मळ, आर. टी. गायकवाड, पवन नाईकवाडे, गणेश देशमुख, कैलास नाईक, श्रीमंत ओव्हाळ, महारुद्र पिसे, सोमवंशी जितेंद्र, पोतदार आर.के, पांडुरंग भोकरे, दिनेश इंगळे व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन डोंगरे आणि मनोज चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य मारुतीराव बिरादार यांनी केले.

 
Top