मंडनगडला न्यायालय होणार 

धाराशिव / प्रतिनिधी-

 मंुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात चांगले काम चालू आहे. कोल्हापूर येथे ही खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला सामाजिक व आर्थिक न्याय मिळण्यासाठी ठिकठिकाणी न्यायालय असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई यांनी केले. 

धाराशिव शहरात महाराष्ट्र आिण गोवा वकील परिषदचे उद्घाटन प्रसंगी न्यायमुर्ती भुषण गवई बोलत होते. धाराशिव नगर परिषदेच्या न्यायमुर्ती बी.एन.देशमुख, सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मंुबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमुर्ती एस.व्ही. गंगापुरवाला, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती प्रसन्न वैराळे, न्यायमुर्ती आरूण पेंडणेकर,  अॅडीशनल सॉलीसीटर जनरल ऑफ इंडिया अनिल सी.सिंग,  माजी न्यायामुर्ती व्ही.के.जाधव, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष न्यायमुर्ती सुरेद्र तावडे, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष अॅड मिलींद पाटील, प्रमुख जिल्हा न्यायाधिश अंजु एस. शेंडे आदींची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना न्या.भुषण गवई यांनी धाराशिव येथील  न्या.बी.एन देशमुख यांनी केलेल्या कार्याचा गौरव ही केला. येत्या कांही महिन्यात मंडनगड येथे न्यायालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे ही त्यांनी सांगितले. तर कर्नाटकचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती प्रसन्न वैराळ यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मांडल्यास तो सर्वांच्या नजरेसमोर येईल, न्यायालयीन कामकाजात अंत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरताना ज्या प्रमाणे लाभ आहे, त्याप्रमाणे धोकापण आहे, असा इशारा ही वैराळे यांनी दिला. 

यावेळी न्यायमुर्ती एस.व्ही. गंगापुरवाला, अॅडीशनल सॉलीसीटर जनरल ऑफ इंडिया अनिल सी.सिंग यांनी ही मार्गदर्शन केले.  राज्यातील पाच विभागातुन १४ ज्येष्ठ वकिलांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. मिलींद पाटील व अॅड.संग्राम देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.नेहा कांबळे व प्रा. अर्चना झाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन धाराशिव विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मुंडे यांनी केले.यावेळी न्यायपालिकेतील न्यायाधिश, अधिकारी,  अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. मिलींद थोबडे,अॅड.राम गरड यांच्यासह राज्यभरातून दोन हजार वकीलांसह पदाधिकारी उपस्थित होते. 


 
Top