धाराशिव / प्रतिनिधी-

 शासनाने राज्यातील जलसाठ्यामधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून “गाळ मुक्तधरण व गाळयुक्त शिवार” हि योजना कायमस्वरुपी राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेंअंतर्गत जलसाठ्यामधून गाळ काढण्याची अंमलबजावणी ही अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी इच्छुक अशासकीय संस्थेने या कार्यालयास दि. 15 मे 2023 रोजी दुपारी 12.00 पर्यंत आपले प्रस्ताव सर्व कागदपत्रासोबत (प्रमाणपत्रासोबत) सादर करावे. या कामासाठी अशासकीय संस्था निवड करण्यासाठी  निकष शासन परिपत्रक दि.04 मे 2023 नुसार आहेत, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी सहा.जिल्हा जलसंधारण अधिकारी पि.के. महामुनी यांचेशी दुरध्वनी क्र. 8999259962 वर संपर्क साधावा.


 
Top