धाराशिव (प्रतिऩीधी) :-  येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश ज्ञानोबा निंबाळकर (वय86) यांचे रविवारी (दि.21) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर छायादीप लान्सच्या पाठीमागे असलेल्या शेतात अंत्यंस्कार करण्यात आले. सकाळी निंबाळकर गल्ली येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय निंबाळकर यांचे ते वडील होत.


 
Top