तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सधन गाव असलेल्या मंगरुळ येथे अवैध दारु विक्री व मटका  या अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढल्यामुळे युवापिडी वाममार्गाला लागण्याची शक्यता असल्याने येथील अवैध धंदे पुर्णता बंद करण्याची मागणी ग्रामस्थांन मधुन केली जात आहे.

तुळजापूर तालुक्यतील मंगरुळ गाव सधनशील आहे  गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार असुन गावाचा आसपास अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे.त्यातच मटका ची ही कीड गावात पसरु  लागली आहे  मोबाईल मुळेसआता मटका घेणे सोपे झाले आहे येथे अवैध दारू विक्री व मटक्यातुन तीस ते चाळीस हजारचा आसपास उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याअवैध धंद्या कडे युवा वर्ग आकर्षीत होण्याची शक्यता असल्याने वेळीच हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थ विशेषता महिला वर्गातुन केली जात आहे.

 
Top