तुळजापूर / प्रतिनिधी-

शहरातील तुळजाई नगर, मधुन घरासमोर लावलेल्या  दोन मोटार सायकली अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडल्याने दुचाकी मालकांन मध्ये  चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 तुळजापूर  शहरातील तुळजाई नगर येथील- कल्याण तुकाराम तोडकरी यांची  व शेजारी राहणारे संजय गलांडे या दोघांच्या  दोन मोटरसायकल अंदाजे 60,000 ₹ किंमतीची   स्प्लेंडर मोटारसायकल क्र.एम.एच.25 एपी 9992, 2) होडां शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 ए 8561  या  दि.027.04.2023 रोजी 11.45 ते दि.28.04.2023 रोजी 06.00 वा. दरम्यान तुळजाईनगर तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशी तक्रार   कल्याण तोडकरी यांनी दि. 09.05.2023 रोजी दिली यावरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांन विरोधात   भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top