नळदुर्ग / प्रतिनिधी-

 राम भक्तांच्या मागणीची दखल घेऊन त्रिवेणी मुद्राई प्रोजेक्ट लिमिटेड (टीएमपीएल)  कंपनीने नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करून देण्याचे काम केले आहे. कंपनीच्या या कार्याचे रामभक्तांनी स्वागत केले आहे.

         राष्ट्रीय महामार्गावरून नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थकडे जाणारा रस्ता अतीशय धोकादायक झाला होता. महामार्ग ओलांडुन श्री क्षेत्र रामतीर्थकडे जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे होते.अतीशय धोकादायक व अपघाताला निमंत्रण देणारा हा रस्ता होता. त्यामुळे  रामभक्तांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासुन हा रस्ता तयार करून द्यावा याबाबत निवेदन देऊन तसेच तोंडीही अनेकदा मागणी केली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे कायम दुर्लक्षच केले होते. सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम त्रिवेणी मुद्राई प्रोजेक्ट कंपनी करीत आहे. या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोजकुमार यांनी या रस्त्याचे काम तात्काळ करून देण्याचे मान्य केले. दि.३ मे रोजी रामभक्तांच्या उपस्थितीत या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रोजेक्ट मॅनेजर मनोजकुमार व इंद्रजितसिंह (मिट्टू) ठाकुर यांच्या सहकार्याने हे काम होत आहे.

        या कामाचा शुभारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजीत डुकरे व पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, अनिल पुदाले,रामभक्त सचिन डुकरे, प्रभाकर घोडके, पप्पु पाटील,बाबु राठोड,पोतदार यांच्यासह रामभक्त उपस्थित होते.


 
Top