धाराशिव / प्रतिनिधी-

 कसबे तडवळे  येथील जिल्हा परिषद आदर्श कन्या प्रा शाळा तडवळे व जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श प्रा शाळा कसबे तडवळे या दोन्ही शाळेचे इयत्ता पाचवी मधील पूर्वउच्य प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे उल्लेखनीय यश मिळवलं असून  तब्बल ८८विद्यार्थी पात्र झाले  आहेत. 

 याबाबत सविस्तर वृत्त असे की तडवळे गावांतील जिल्हा परिषद कन्या शाळा व जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे एकूण ८८विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले असून सदरील परीक्षा ही  ३०० गुणांची असून जिल्हा परिषद कन्या शाळेतील विध्यार्थीनी कु.संस्कृती सत्यवान म्हेत्रे हिला २५८ मार्क पडले असून या कन्या शाळेतील एकूण ४८विद्यार्थीनी पात्र झाल्या आहेत व जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील कु.सोहम प्रताप करंजकर या विद्यार्थ्यांला २५६ गुण प्राप्त झाले व २०० पेक्षा जास्त गुण घेणारे दहा विद्यार्थी असून या शाळेचे एकूण ४०विद्यार्थी पात्र झाले आहेत या दोन्ही जिल्हा परिषद शाळेचे मिळून एकूण ८८विद्यार्थी पात्र झाल्याने या विद्यार्थ्यांचा 

 उच्च पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्जवल यश मिळवल्या बद्दल यांचा जि.प.कन्या प्रा. शाळेमध्ये  दोन्ही शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य आणी ग्रामस्थांच्या वतीने पेन पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले,यावेळी कन्या शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर,केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक पवार सर ,आदर्श शिक्षक जगनाथ धायगुडे , आदर्श शिक्षक बाळासाहेब जमाले सर ,अजय जानराव ,मगर सर,कोळी मॅडम ,देशमुख मॅडम , शाम धाबेकर, सह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.


 
Top