धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्रीपतराव भोसले माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी, पालकांना मान्यवरांच्या हस्ते मोफत 510 कृत्रिम पक्ष्यांची कृत्रिम घरटे वाटपाचा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट दुर्मिळ होत चाललाय. पक्षी गणनेतही आपल्या शहरात चिमण्यांची संख्या नगण्य आढळली. चिमण्यांना स्वतःचे घरटे बनवण्यासाठी आधाराची, एखाद्या कोपर्‍याची गरज असते. तोच आधार देण्यासाठी आणि उस्मानाबाद शहरातील चिमण्यांची संख्या वाढावी, त्यांचे संवर्धन व्हावे, पर्यावरण संतुलनात थोडासा हातभार लागावा यासाठी काही दिवसांपूर्वी पक्षी अभ्यासक प्रा.मनोज डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतराव भोसले माध्य.व उच्च विद्यालयात आयोजित कार्यशाळेत 150 विद्यार्थ्यांनी 510 घरटे बनवली होती.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ.प्रेमाताई पाटील, प्राचार्य साहेबराव देशमुख, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, संस्था सदस्य गाडे पी.एल., राष्ट्रपती पुरस्कार विजेते पठाण वाय.के., उपप्राचार्य संतोष घार्गे, माजी पर्यवेक्षक बोबडे ए.बी यांच्या हस्ते घरट्यांचे वाटप केले.

राबवला.  यावेळी बोलताना सौ.प्रेमाताई पाटील यांनी तुम्हीही वापरात नसलेली खोकी, बाटल्या यांपासून घरटी बनवून या मुक्या जीवांच्या संवर्धनात मोलाचे योगदान देवू शकता, असे प्रतिपादन केले. 

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप तर आभार प्रा.नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.

 
Top