तुळजापूर / प्रतिनिधी-

 शुक्रवारी आलेली वैशाखी पोर्णिमा  तसेच   बुध्दजयंती सुट्टी पार्श्वभूमीवर   शुक्रवार दि.५ रोजी  श्री तुळजाभवानी देवीजीच्या दर्शनार्थ  भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. वैशाखी पोर्णिमा पार्श्वभूमीवर गाभाऱ्यात  फुलांचा आकर्षक  आरस करण्यात आला होता.

 शुक्रवार पहाटे पासुन दर्शनार्थ  भाविकांचा रांगा लागल्या होत्या. दिवसा भाविकांचा प्रचंड ओघ वाढला तो सांयकाळ पर्यंत जैसा थे राहिल असे दृश्य दिसत होते.   दर्शनासाठी अँक्सेस पासेस काढण्यासाठी  भाविकांना ञास सहन करावा लागला दर्शन पास साठी रांगा, स्नानासाठी रांगा , दर्शनासाठी  रांगा आज सर्वञ रांगाच रागा दिसुन आल्या. 

 
Top