धाराशिव /प्रतिनिधी -

 येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अँटी रॅगिंग कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांची निवड करण्यात आली आहे.

तर सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते तथा अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांची निवड करण्यात आली आहे.फिरोज पल्ला यांनी गेल्या ६ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात योगदान दिले असून, कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केले होते.सामाजिक क्षेत्रातील त्यांचे याेगदान विचारात घेऊन महाविद्यालयाने ही निवड केली असून, या निवडीबद्दल पल्ला यांचे अभिनंदन होत आहे. त्यांना डॉ.दोमकुंडवार यांनी निवडीचे पत्र दिले आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचा छळ करणे, एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या मनाविरुद्ध कृत्य करण्यास भाग पाडणे, त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी म्हणून शासनाने प्रत्येक महाविद्यालयात अँटी रॅगिंग कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे

 
Top