तुळजापूर / प्रतिनिधी-

विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचारधारा ठेवली पाहिजे ही विचारधारा यशस्वीतेकडे मार्गक्रमण करते असे प्रतिपादन उस्मानाबादचे तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी केले. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.

स्पर्धेमध्ये कु. शिवअस्मिता साठे हीने प्रथम क्रमांक,  अंकिता क्षिरसागर हीने द्वितीय क्रमांक तर   स्वरांजली बडुरे हीने तृतीय क्रमांक पटकावला.तसेच कु. सानिका रोडे, भक्ती साठे व   दिव्या तिकोणे या मुलींनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. यावेळी कु. कृष्णाई उळेकर यांचा सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  नागनाथअप्पा वझे यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन तर  वैजिनाथप्पा टाकणे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुरूवातीला कृष्णाई उळेकर यांची मुलाखत प्रा. विवेक कोरे यांनी घेतली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उस्मानाबाद मा. डॉ. शिवानंद बिडवे  तर प्रमुख अतिथी म्हणून मा. राजकुमार केलुरकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सौ. दिपा मस्के,   संजिवनी तोडकरी,  महानंदा टाकणे,   शुभांगी करिशेट्टी, सौ. संगिता नडमणे,  रेश्मा टाकणे,  कृष्णाई उळेकर,  कोमल तिकोणे,  अंकीता क्षिरसागर,  गौरी टाकणे, महादेव तोडकरी, ओंकार मस्के, विक्रम बचाटे, ओंकार साडेगावकर, महेश नडमणे, अजिंक्य आडसकर, वैजिनाथ टाकणे, अरूण तोडकरी,औदुंबर वझे, अभिषेक कोरे, महेश पाटील, गोविंद साठे, प्रमोद क्षिरसागर, महादेव बडुरे, प्रकाश टाकणे, सचिन उपासे, नागराज तोडकरी, प्रफुल्लकुमार शेटे,प्रभाकर उळेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे तर आभार प्रदर्शन ॲड. ओंकार मस्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीने पुढाकार घेतला.


 
Top