धाराशिव / प्रतिनिधी-

बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद लातूर सोलापूर बीड व अहमदनगर जिल्हा कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली बहुराज्य नागरी सहकारी बँक उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि उस्मानाबाद या बँकेचे मोठे योगदान असून  बँक 90 वर्षाचा टप्पा पूर्ण करून 91 व्या वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे

     बँकेच्या एकूण ठेवी 1824.62 कोटी कर्जे 1083.16 कोटीव बँकेचा एकूण व्यवसाय  2907.78 कोटी आहे बँकेचे संचालक व सर्व कर्मचारी यांनी सर्वतोपरी मेहनत करून बँकेचा माहे मार्च2023 अखेर नेट एन पी ए शून्य टक्के पर्यंत आणलेला आहे

         त्यामुळे बँकेचे वसंतराव नागदे यांच्या अध्यक्षतेखाली दि 30 -4- 2023 रोजी कर्मचाऱ्याचे मनोबल यापुढे ही असेच वृद्धिंगत रहावे म्हणून बँकेच्या वतीने सर्व संचालक व कर्मचारी यांच्यासाठी स्नेह मेळावा व बँकेतील सर्व स्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांच्याकरिता प्रोत्साहनपर बक्षीस वितरण कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृह धाराशिव येथे आयोजित करून तो यशस्वीपणे पार पडलेला आहे

       प्रथम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय घोडके यांनी प्रास्ताविक सादर केल्यानंतर बँकेचे कर्मचारी परमेश्वर माने व मल्हार मोकाशे यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रदीप जाधवपाटील संचालक बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी अध्यक्ष विश्वास  शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर बँकेच्या बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनी  अध्यक्षीय भाषण केले   पांडुरंग बनसोडे यांनी आभार मानले

 
Top