धाराशिव / प्रतिनिधी-

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीला ७६ जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला ६८ जागा मिळाल्या, असे असताना ही कांही मीडिया ने महायुतीला धक्का असा शब्द प्रयोग केला. निवडणुकीचे विश्लेषण करताना पुर्ण माहिती मीडिया घेऊन बातमी करने आवश्यक आहे. नाहीतर हक्क भंग दाखल करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

१ मे निमित्ताने पालकमंत्री सावंत धाराशिव शहरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सावंत यांनी गेल्या ६३ वर्षांत भाजप सेना महायुतीला  अशा सोसायट्या आहेत का नाहीत हे माहित नव्हते. जिल्हयातील ८ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७६ जागा सेना-भाजप महायुतीला मिळाल्या तर ६८ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. तरी सुध्दा मीडियाने महायुतीचे अपयश असा उल्लेख केला. वास्तविक ५५ टक्के जागा भाजप-सेनेला मिळाल्या असताना देखील याला धक्का, तो आपडला हे दाखविणे योग्य नाही. लोकांचे मत मांडा, बातम्यामध्ये तुमचे मते मांडू नका, असे संागून मंत्री सावंत यांनी गेल्या ४० वर्षांत समिती निवडणुकीमध्ये ठराव पक्षांची मक्तेदारी होती. यामध्ये आम्ही यावेळेस मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ८० टक्के यश भाजप-सेनेला मिळाले आहे. २० टक्के यश महाविकास आघाडीला मिळाले आहे, असा दावा ही मंत्री सावंत यांनी केला. यावेळी अामदार ज्ञानराज चौगुले उपस्थित होते. 

 
Top