धाराशिव (प्रतिनीधी) ः-  रोलबॉल असोसिएशन ऑफ उस्मानाबाद या एकविध जिल्हा संघटनेचे नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कार्याध्यक्षपदी सचिन शिंदे तर सचिवपदी गिरीश पाळणे यांची निवड करण्यात आली आहे. रोलबॉल हा एक मान्यताप्राप्त क्रीडाप्रकार असून मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात विविध प्रशिक्षण केंद्रातून अनेक राज्य राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले गेले आहेत. महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या अधिपत्याखाली जिल्हा संघटनेचे कार्य जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे चालण्याच्या दृष्टीने व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्यासह जास्तीत जास्त प्रशिक्षण केंद्र चालू करण्याचा मानस ठेवत धाराशिव येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून खेळाच्या विकासासाठी अनेकांना जबाबदार्‍याही देण्यात आल्या आहेत. रोलबॉल असोसिएशन ऑफ उस्मानाबाद जिल्हा संघटनेची निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कार्याध्यक्षपदी सचिन शिंदे, उपाध्यक्षपदी धनंजय पाटील, सचिवपदी गिरीश पाळणे, साहसचिवपदी प्रताप राठोड, कोषाध्यक्षपदी सचिन देवगिरे, तर सदस्य पदी धनंजय पाडुळे, कैलास लांडगे व अमोल काळे यांचा समावेश असून रोलबॉल खेळ विकास समितीच्या अध्यक्षपदी उदय काकडे, स्पर्धा विभाग समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर खरमाटे, तांत्रिक समिती अध्यक्षपदी प्रताप राठोड सचिवपदी कैलास लांडगे तर सदस्यपदी ओंकार चौरे व मनोज जाधवर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या कार्यकारिणीत बदल करण्यात आल्याने भविष्यात रोलबॉल या खेळाचा विकासासह खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह सुविधाही उपलब्ध होणार असल्याने खेळाडूंच्या अशाही पल्लवित झाल्या आहेत.

 
Top