तुळजापूर (प्रतिनीधी) ः- श्री तुळजाभवानी मंदिरात डीझीटल बँनर लावणे प्रकरणी  शितोळे नागेश यशवंतराव सहा.व्यवस्थापक (धार्मिक) तथा सहा, जनसंपर्क अधिकारी, श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाविकांनी ड्रेसकोड परिधान करणे प्रकरणी  दिनांक 18/05/2023 रोजीच्या प्रत्यक्ष स्थळ पहाणी अन्वये. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या श्री तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्र राज्यातून तसेच देशातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश व इतर राज्यातून भाविक मोठया संख्येने श्री देविजांच्या दर्शनासाठी येतात. आज दिनांक 18/05/2023 वार गुरुवाश्रीतुळजाभवानी रोजी मंदिर व मंदिर परिसराची पहाणी करीत असताना असे निदर्शनास आले आहे की, मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी असभ्य आणि अशोभनीय कपडे घालण्यास बंदी असल्याचे डिजीटल बॅनर लावल्याचे निदर्शनास आले आहे. सदर डिजीटल बॅनर लावणेपुर्वी आपण वरिष्ठांची कोणतीही पूर्व परवानगी घेतल्याचे निदर्शनास आले नाही. अथवा या बाबत वरिष्ठांना पुर्व सुचना दिल्या नाहीत, ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे. तरी या बाबत आपला लेखी खुलासा ही नोटीस मिळालेपासून 48 तासाचे आत  निम्नस्वाक्षरीतांकडे सादर करावा. खुलासा असमाधानकारक असल्यास अथवा मुदतीत प्राप्त न झाल्यास आपले विरुध्द प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा आदेश तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन)  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी काढला आहे  याचि  माहितीस्तव सविनय मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर मा. उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद तथा विश्वस्त, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

 
Top