तुळजापूर (प्रतिनीधी) ः- तालुक्यातील मंगरुळ सरडेवाडी परिसरात असणार्‍या श्रीशैनेश्वर मंदीरात  वैशाखी अमावस्या दिनी आलेल्या श्रीशैनेश्वर जयंती निमित्ताने  शनिदेवतेचा दर्शनार्थ भाविकांनी शुक्रवार दिरोजी मोठी गर्दी केली होती मंगरुळ सरडेवाडी परिसरत श्रीशैनेश्वर मंदीर असुन येथे सकाळी श्रीशैनेश्वर मुर्तीस तैलअभिषेक करण्यात आला नंतर  नैवध दाखवुन आरती करण्यात आली या पुजेचे पौराहित्य श्रीशैनेश्वर चे पारंपरिक पुजारी यादव यांनी केले ,नंतर येथे दुपारी महाप्रसाद वाटप कार्यक्रम झाला याचा हजारो शनिभक्तांनी लाभ घेतला .शनिजयंतीअमावस्या निमित्ताने श्रीशैनेश्वर दर्शनार्थ आलेल्या भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर रक्तदान केले या रक्तदान शिबीरात शेकडो भक्तिंनी रक्तदान केले.

 
Top