धाराशिव / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी कार्यालय धाराशिव येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडली. या बैठकीस मा.आ. सुजितसिंह ठाकुर, आ. राणाजगजितसिंह पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, संघटन मंत्री संजयजी कौडगे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रा.‍ किरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी उपस्थीत होते.

 यावेळी धाराशिव जिल्हयातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोशल मिडीया संदर्भात आढावा घेण्यात आला यामध्ये फेसबुक, व्हॉटसॲप, टवीटर या संदर्भात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना माहिती देण्यात आले. तसेच सदर बैढकीत सोशल मिडीया जास्तीत जास्त वापरात आणुन त्याचा योग्य वापर करावा असे ही प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले.

 यावेळी सोशल मिडीया संयोजक पांडुरंग अण्णा पवार, मकरंद पाटील  व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.


 
Top