सोहळ्यात २४ बटूवंर उपनयन संस्कार

धाराशिव / प्रतिनिधी-

  येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट धाराशिव आयोजित सामुदायीक उपनयन सोहळा बुधवार, १० मे रोजी शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात २४ बटूवर उपनयन संस्कार करण्यात आले.

मागील वर्षापासून धाराशिव शहरात ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिव द्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवार, १० मे रोजी शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात सामुदायीक उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११.०१ मिनीटाच्या शुभ मुहूर्तावर हे उपनयन संस्कार करण्यात आले. या सोहळ्यात २४ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. या सोहळ्यात बटूंना आशिर्वाद देण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, श्री. सिध्दीविनायक परिवाराचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा डॉ. उर्मिला गजेंद्रगडकर, प्रदीप कुलकर्णी, अ‍ॅड. अभय भोसरेकर, अतुल भोसरेकर, रामचंद्र जोशी, संजय शेटे, संतोष शेटे, मोहन कुलकर्णी, डॉ. अनंत सुरु, अतुल महाजन, अविनाश सुभेदार, डॉ. हर्षल डंबळ, पी. एस. कुलकर्णी, गोपाळ व्यास, संतोष देशपांडे, श्रीराम अनसिंगेकर, मोहनराव नाईक यांच्यासह शहरातील इतर मान्यवर व समाजातील नागरीकांची उपस्थिती होती.

या सामुदायीक उपनयन संस्कार सोहळ्याच्या चोख नियोजनाबद्दल सर्व बटू पालक व उपस्थित समाज बांधवानी समाधान व्यक्त करत आभार मानले. तसेच ब्राह्मण कल्याण  ट्रस्टच्या वतीने आयोजित विविध सामाजिक उपक्रमामध्ये खंबीर साथ देण्याची ग्वाही दिली. हा उपनयन सोहळा यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवचे सर्व सदस्य, स्वयंसेवक, महिला स्वयंसेवक व धाराशिव पुरोहित संघाने परिश्रम घेतले.


 
Top