उमरगा/प्रतिनिधी-

 उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असुन अठरा जागेपैकी अकरा जागा मिळाल्या.भाजप - शिवसेनेला मात्र सात जागेवर समाधान मानावे लागले.यात बाजार समितीचे सभापती एम.ए.सुलतान यांना पराभव पत्करावा लागला तर पसचें माजी उपसभापती युवराज जाधव यांचा एका मताने पराभव झाल्याने हा निकाल त्यांच्या जिव्हारी लागला त्यांनी पुनर मतमोजणी करण्यासाठी अर्ज दिला मात्र यातूनही कांहीच साध्य झाले नाही त्यामुळे भाजप सेनेची निराशा झाली.

उमरगा बाजार समितीच्या अठरा जागेसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शुक्रवारी (दि.२८) मतदान प्रक्रियेत ९८. ६९ टक्के मतदान झाले होते. शनिवारी सकाळी नऊ वाजता बाजार समितीच्या सभागृहात चार टेबलवर मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा बहुमताचा कल निश्चित होणाऱ्या सेवा सहकारी संस्था मतदारसंघाच्या अकरा जागेच्या मतमोजणीत  महाविकास आघाडीचा सर्वच अकरा उमेदवार निवडूण आल्याने बहुमत झाले, तेथेच भाजप - शिवसेनला धक्का बसला. सहकारी संस्थेतील महाविकास आघाडीचे सर्वसाधारण गटातील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : 

बसवराज कस्तुरे (१७९), प्रल्हाद काळे (१८८), सुभाष गायकवाड (१७०), रणधीर पवार (२०२), मारुती पाटील (१८५), कृष्णा माने (१८३), सिद्राम हत्तरगे (१७४). भाजप -शिवसेनेच्या सर्वसाधारण गटातील पराभूत उमेदवार व मिळालेले मतदान पुढीलप्रमाणे : शरद इंगळे (१५७), सतीश चालुक्य (१५५), युवराज जाधव (१६९), मुरलीधर पवार (१४३), व्यंकट पाटील (१४७), दत्तात्रय वाडीकर (१४७), मोहियोद्दीन सुलतान (१६९) दत्तू कटकधोंड (अपक्ष -१३). महिला प्रतिनिधी महाविकास आघाडी विजयी उमेदवार : मंगलबाई औरादे (२०२), अहिल्याबाई  जगदाळे (१९२). भाजपा -शिवसेनाच्या पराभूत उमेदवार : योजना कोराळे (१६९), कोमलबाई गायकवाड (१५६). 

इतर मागासवर्गीय मतदारसंघ : महाविकास आघाडी विजयी उमेदवार- राजेंद्र तळीखेडे (१९३), पराभूत उमेदवार

कैलास आष्टे (१६२). विमुक्त जाती भटक्या जमाती मविआ विजयी उमेदवार : किरण कुकुर्डे (१९७), पराभूत उमेदवार शिवाजी सुरवसे (१६७).

ग्रामपंचायत मतदारसंघातील भाजप - शिवसेनेचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :   सर्वसाधारण गट : विजयकुमार माने (२१७), शरद माने (२०७). पराभूत उमेदवार श्रीराम जगदाळे (११६), संजीव पाटील (१२१) मविआ. भाजप - शिवसेना अनुसूचित जाती जमाती विजयी उमेदवार : सारिका कांबळे (२३८). कमलाकर काजळे मविआ (१३६). आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक भाजप शिवसेना विजयी उमेदवार विक्रम इंगळे (२५०), मविआ उमेदवार देविदास चव्हाण मविआ (१२७). व्यापारी मतदार संघ भाजप - शिवसेना विजयी उमेदवार : सचिन जाधव (१५३), बालाजी महावरकर (१२३). मविआ उमेदवार प्रदीप गिरीबा (१०६), विजयकुमार थिटे (८७). शाहूराज माने (अपक्ष ०६). हमाल मापडी मतदारसंघ भाजप - शिवसेना विजयी उमेदवार : लक्ष्मण खराते (७५), मविआ उमेदवार अशोक बनसोडे (४९).

निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर गुंजकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस.जी. माळी यांनी काम पाहिले. क्षेत्रिय अधिकारी म्हणुन बालाजी काळे यांनी काम पाहिले. या वेळी पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड,महेश क्षीरसागर, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

७६ मतदान अवैध

अटीतटीच्या लढतीत कोणतेही मत बाद होऊ नये म्हणून कमालीचे प्रयत्न केले जातात मात्र बाजार समितीच्या निवडक मतदारात ७६ मते बाद झाली आहेत.

सहकारी संस्थेत ४०,

ग्रामपंचायतीमध्ये ३३, व्यापारी मतदारसंघात एक तर हमाल मापाडी मतदारसंघात दोन मतदान असे ७६ मतदान अवैध ठरले. एका मतदाराची तर कोरी मतपत्रिका आढळून

 
Top