धाराशिव / प्रतिनिधी-

 प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण तसेच त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होण्याच्या दृष्टीने प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत सुशिखित बेरोजगार युवकांकरीता ऑटो मालवाहतूक (तीन चाकी) वाहन वाटप ही जिल्हा अदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात आलेली आहे.

 या योजनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्हयातील पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार पात्र लाभार्थीना आज महाराष्ट्र दिन ध्वजारोहण समारंभावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री  तानाजीराव सावंत   आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थी संजू सूरज पवार यांना वाटप करण्यात आले. सदर योजना राबविल्याबद्दल  तानाजीराव सावंत   पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री यांनी   जिल्हाधिकारी उस्मानाबाद व   प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा आव्हाळे सोलापूर यांचे अभिनंदन व कौतुक करून लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे , मा. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता ,  पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी  , निवासी उपजिल्हाधिकारी   शिवकुमार स्वामी  , उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन )   कोरडे  , उपजिल्हाधिकारी   माने  , जिल्हा शल्यचिकीत्सक  डॉ.   राजाभाऊ गलांडे, प्रांताधिकारी  शेंडे , सहायक प्रकल्प अधिकारी  धनंजय रोकडे,  सुनिल काळे प्रदेश कार्याध्यक्ष अदिवासी पारधी महासंघ यांचे या योजनेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. तसेच  प्रदिप समुद्रे, गृहपाल, तसेच पारधी समाजबांधव दिलीप काळे,  दादा काळे,  छगन पवार  बाजीराव पवार इत्यादीची उपस्थिती होती.


 
Top