तुळजापूर / प्रतिनिधी-

 संभाजी नगर परिक्षेत्र चे विशेष पोलीस महानिरीक्षक   ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पदभार स्विकारताच मंगळवार दि. १० रोजी  तिर्थक्षेञी  तुळजापुर येथे येवुन  श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे  दर्शन घेतले  नंतर धाराशिव येथे जावुन जिल्हयाचा आढावा घेतला.

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथेआगमन होताच प्रथमता पो नि अदिनाथ काशीद यांनी त्यांचे स्वागत केले.नंतर थेट मंदीरात जावुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले नंतर

मंदिर संस्थानच्या वतीने नागेश शितोळे सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक यांनी त्यांच्या देविची प्रतिमा देवुन   सत्कार केला.

 यावेळी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अभियंता राजकुमार भोसले,   उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक व अधिकारी व कर्मचारी सुरक्षारक्षक उपस्थित होते.


 
Top